‘बुलेटराजांवर’कारवाईचा बडगा

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) :,  कर्णकर्कश आवाज काढणार्‍या, फटाका बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करत ३२ मॉडिफाइड सायलेन्सर रोडरोलरने कुचलून नष्ट केले. ही कारवाई ग्रामीण पोलिसांनी पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात केली.
नागरिक, रुग्ण, वृद्ध, महिला व मुलांना होणारा मानसिक, शारीरिक त्रास लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरत ही मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. कारवाईदरम्यान ३२ बुलेट दुचाकींचे मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले.संबंधित वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून सायलेन्सर तत्काळ काढून घेण्यात आले. 
कर्णकर्कश आवाजामुळे रुग्णालय परिसर, वसाहती, बाजारपेठा, शाळा परिसर तसेच मुख्य चौकांमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत होत्या.